Solapur : उद्धव ठाकरे सांगोल्यात आले तर आनंद होईल पण स्वागताला मी नसेल : आमदार शहाजी बापू पाटील

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असेन
आमदार शहाजी बापू पाटील
आमदार शहाजी बापू पाटीलsakal
Updated on

सांगोला :  उद्धव ठाकरे सांगोल्यात यायचे असतील तर आंनदच होईल. परंतु मी त्यांच्या स्वागतासाठी असणार नाही त्यांचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असेन असे मत सांगोल्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यात सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या संगेवाडी, मांजरी गावामध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी पिकांच्या पाहणीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर  आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याबरोबर सत्तेतून बाहेर पडलेले आमदार बच्चू कडू व राणा यांच्यातील वादाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, हे दोघेही मोठे नेते असून लवकरच यांच्यातील वाद निश्चितपणे संपुष्टात येईल.

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सांगोला दौऱ्यासाठी येणार असून त्यांच्या स्वागत करणार का असे विचारले असता उद्धव ठाकरे सांगोला येणार असतील तर मला आनंदच होईल परंतु त्यांच्या स्वागतासठी मी जाणार नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असेन असेही शेवटी त्यांनी आवर्जून सांगितले. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात कोणीही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही. दहा गुंठे पिकाचेही पंचनामे करून अधिकारी, कर्मचारी अहवाल देतील असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com