या सगळ्या प्रकाराची मंगळवेढा पोलिस ठाण्यात (Mangalwedha Police Station) तक्रार दिली आहे. त्यावर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.
पंढरपूर : वाल्मीक कराडनंतर (Walmik Karad) आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील शेतकरी नवनाथ प्रकाश व्हरे या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष (Ajit Pawar Group) रामेश्वर मासाळ यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दोन एकर शेत जमीन खरेदी केल्याचा आरोप व्हरे कुटुंबाने केला आहे.