जगाचा पोशिंद्याचा दानशूरपणा; भुकेल्यांसाठी दिली 18 क्विंटल ज्वारी

Farmers at Diksal made 18 quintals sorghum of Deposits
Farmers at Diksal made 18 quintals sorghum of Deposits

नरखेड (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा कठीण परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्या गरिबांच्या भुकेल्या पोटाला दोन घास भाजी-भाकरी मिळावी म्हणून जगाचा पोशिंदा असणाऱ्या डिकसळ (ता. मोहोळ) येथील शेतकऱ्यांनी तब्बल 18 क्विंटल ज्वारी जमा करून तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे सुपूर्द केली. 

लॉकडाउनमुळे देशासह राज्यातील काही कुटुंबे जिथल्या तिथेच क्वारंटाइन केली आहेत. त्यामुळे राज्यभर अनेक लोक अडकले आहेत. अशा भीषण परिस्थितीत अडकलेल्या लोकांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात व राज्यात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून शासनाने उचललेले खबरदारीचे पाऊल म्हणजेच "धान्य दान' योजना होय. या योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. यातील एक उदाहरण म्हणजे डिकसळ येथील शेतकऱ्यांनी केलेली मदत होय. येथील बळिराजाने सढळ हाताने तब्बल 18 क्विंटल ज्वारी दान केली आहे. 
ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पंढरपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोणे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार डिकसळ येथील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दोन दिवसांत 18 क्विंटल ज्वारी विठ्ठल मंदिरात जमा करून ती तहसीलदारांकडे सुपूर्द केली. 

संकटग्रस्तांची भूक महत्त्वाची 
ज्वारीचे उत्पादन यंदा असमाधानकारक असूनही स्वतःच्या भाकरीपेक्षा संकटग्रस्तांची भूकही महत्त्वाची आहे. हेच जगाच्या पोशिंद्याने जाणून शासनाच्या हाकेला साद दिली. जमा झलेली ज्वारी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करताना शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com