
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत मंगळवेढा महसूल मंडळ मधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना विमा कंपनीच्या प्रतिनिधी मनमानी केल्याने कमी भरपाई मिळाली तर अद्याप काही शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनी आणि कृषी खाते याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी केली.