
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वाळू स्थळांचा लिलाव झालेला नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा, वाळू साठा व वाळू वाहतूक होत असल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. वाळूसाठा ज्या जागेत आहे, त्या जागा मालकांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील तहसीलदारांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.