
-रामेश्वर विभूते
सोलापूर : घरादाराची स्वच्छता करण्यासाठी उपयोगी अशी केरसुणी सध्या दुप्पट किमतीने बाजारात विक्री होत आहे. काही महिन्यांपूर्वी अवघ्या २० ते ३० रुपयांना एक असणारी केरसुणी आता ५० ते ६० रुपयांना एक मिळत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा हा परिणाम असल्याचे उत्पादकांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगात सफाईची विविध साधने बाजारात उपलब्ध असली तरी केरसुणीचे महत्व वेगळे असून केरसुणीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.