esakal | Corona : शहरातून आलेल्यांना सर्दी, तापाच्या लक्षणांनी अफवा 

बोलून बातमी शोधा

The fear of Corona in Solapur district

राजुरी (ता. करमाळा) येथे पुणे येथून आलेल्या एका तरुणाला सर्दी, ताप, खोकला व घसा खवखवणे अशी लक्षणे दिसून आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालय, पोलिस ठाणे यांना माहिती देऊन संबंधित रुग्णाची उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी करण्यात आली आहे.

Corona : शहरातून आलेल्यांना सर्दी, तापाच्या लक्षणांनी अफवा 
sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या भीतीने शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर लोक ग्रामीण भागात येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांत मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून आलेल्या लोकांची नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. 

राजुरी (ता. करमाळा) येथे पुणे येथून आलेल्या एका तरुणाला सर्दी, ताप, खोकला व घसा खवखवणे अशी लक्षणे दिसून आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालय, पोलिस ठाणे यांना माहिती देऊन संबंधित रुग्णाची उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी करण्यात आली आहे. तहसीलदार समीर माने यांनी स्वतः राजुरी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. संबंधित रुग्णास सर्दी, खोकला जरी असला तरीही त्याच्यात कोरोनाची कुठली लक्षणे दिसून येत नसल्याने त्याला घरी पाठवण्यात आले आहे. संबंधित रुग्णास घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
असाच प्रकार उमरड (ता. करमाळा) येथे देखील घडला आहे. येथे पुण्यातूनच आलेल्या एका कुटुंबातील मुलाला सर्दी, ताप व खोकला येत असल्याने येथील सरपंच, पोलिस पाटील यांनी याविषयी तहसीलदार व पोलिसांना माहिती दिली आहे. याही मुलाची तपासणी करून त्याला घरी पाठवण्यात आले आहे. सध्या करमाळा तालुक्‍यात शहरातून आलेल्या लोकांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . 
करमाळा तालुक्‍यात पुणे, मुंबई व इतर शहरातून मोठ्या प्रमाणावर लोक आले आहेत. तालुक्‍याच्या प्रत्येक गावात शहरातून लोक दाखल झाले असून काही गावांत ही संख्या जास्त आहे. कोर्टी, पोंधवडी, विहाळ, वीट, मोरवड, वंजारवाडी, रायगाव, अंजनडोह, फिसरे, हिसरे, साडे, सालसे, केम, जेऊर या भागात मोठ्या प्रमाणावर शहरातून लोक दाखल झाले आहेत. 
करमाळा शहरात आज दिवसभर पोलिसांनी गस्त घालत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तहसीलदार समीर माने यांनी करमाळा तालुक्‍यातील खासगी डॉक्‍टरांची बैठक घेऊन रुग्णांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत माहिती दिली आहे.