Shobha Dongare
sakal
मोहोळ - पापरी, ता. मोहोळ येथील महिला शेतकरी शोभा बाबुराव डोंगरे (वय-35) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवार ता. 10 रोजी दुपारी घडली. उष्माघाताचा मोहोळ तालुक्यातील गेल्या पंधरा दिवसातील हा दुसरा मृत्यू आहे.
या संदर्भात मृत शोभा यांच्या कुटुंबिया कडून मिळालेल्या माहिती नुसार, डोंगरे कुटुंबीयां कडे शेत जमीन आहे. त्यांनी शेतात गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. सकाळी लवकर शेतात जाऊन गुलछडी दुपार पर्यंत तोडून ती व्यापाऱ्याला द्यावयाची अशी पद्धत सध्या पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यात प्रचलित आहे.