Solapur Loksabha Constituency : सोलापूर लोकसभेसाठी युवा आमदारांमध्ये लढत ; आ. प्रणिती शिंदे व आ. राम सातपुते

सोलापूर लोकसभेसाठी भाजपाच्या उमेदवाराची प्रतीक्षा संपून आ. राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी भाजपाने जाहीर केल्यानंतर आ. प्रणिती शिंदे व आ. राम सातपुते या दोन युवा आमदारातील लढतीत मंगळवेढ्यातील राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.
Solapur Loksabha Constituency
Solapur Loksabha Constituencysakal

मंगळवेढा :- सोलापूर लोकसभेसाठी भाजपाच्या उमेदवाराची प्रतीक्षा संपून आ. राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी भाजपाने जाहीर केल्यानंतर आ. प्रणिती शिंदे व आ. राम सातपुते या दोन युवा आमदारातील लढतीत मंगळवेढ्यातील राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.

सलग दोन टर्म भाजपाचा खासदार या मतदारसंघातून विजयी झाला. केंद्रात व राज्यात सत्ता असताना त्या सत्तेचा लाभ तालुक्याला अपेक्षित असा लाभ झाला नाही.खा.शरद बनसोडे हे ज्या गावात प्रचाराला गेले नाहीत त्या गावात देखील खासदार फंड देऊन देण्याचे शशिकांत चव्हाण,सुदर्शन यादव,गौरीशंकर बुरकूल,राजेद्र सुरवसे,नागेश डोंगरे यांनी केले तर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न लोकसभेत मांडला मात्र त्या पाणीप्रश्नी लोकसभेत सातत्याने म्हणावे तितके प्रयत्न केले नाहीत व पंढरपूर- विजयपूर रेल्वे मार्गासाठी देखील प्रयत्न केले नसल्यामुळे हा प्रश्न तसाच राहिला तर खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे देखील मोदीच्या लाटेत निवडून आले मात्र तालुक्यातील प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले.

खासदार फंड देखील निवडक ठिकाणी दिला अन्य गावात दिला नसल्यामुळे त्या गावातही सध्या नाराजी आहेत. तर पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्गासाठी देखील त्यांनी म्हणावे तितकी ताकद लावली नाही शिवाय शेतकऱ्यांना पिक विमा दुष्काळाच्या ट्रिगर वन मधून मंगळवेढ्याला वगळले यावरून असलेली नाराजी ओळखून भाजप नेतृत्वाने आ राम सातपुते यांच्यावर लोकसभेची उमेदवारी सोपवली.

आ सातपुते यांनी विधानसभेत अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडले तर त्यांच्या विरोधात असलेल्या आ.प्रणिती शिंदे यांनी देखील विधानसभेत प्रश्न मांडले आहेत तर मंगळवेढ्यातल्या प्रश्नासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले.त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असली तरी मंगळवेढ्यातील आ.सातपुते यांची जबाबदारी आ. समाधान आवताडे ,मा आ. प्रशांत परिचारक ,भाजपाचे शशिकांत चव्हाण,प्रदीप खांडेकर,सुदर्शन यादव,राजेद्र सुरवसे,गौरीशंकर बुरकूल,गोपाळ भगरे,नागेश डोंगरे,आदित्य हिन्दुस्तानी, तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रतिक किल्लेदार, राष्ट्रवादीचे अजित जगताप, प्रवीण खवतोडे, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, अरुण किल्लेदार,

Solapur Loksabha Constituency
Solapur Lok Sabha Poll : उमेदवारीवरून नाराजी, ढोबळे कन्येने ठेवला शरद पवाराचा व्हाट्सअप स्टेटस

यांच्यावर तर महाविकास आघाडीची जबाबदारी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, राहुल शहा, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कौडूभैरी,मुजमिल काझी,माणिक गुंगे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रा. येताळा भगत ,दत्तात्रय भोसले तर काँग्रेसचे जबाबदारी प्रा.शिवाजीराव काळुंगे,अड नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, पांडुरंग जावळे, राजेंद्र चेळेकर , मनोज माळी, अॅड.रविकिरण कोळेकर, सुरेश कोळेकर, यांच्यावर आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षावर असलेल्या नाराजीचे रूपांतर मतात करण्यात महाविकास आघाडीचे नेते कशा पद्धतीने यशस्वी होतात तर आ. समाधान आवताडे यांनी तीन वर्षाच्या काळात तालुक्यात कोट्यावधीचा निधी प्राप्त केला.झालेली विकास कामे व नुकतीच मंजुरी मिळालेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनाचा लाभ घेत भाजप नेते देखील त्याचे रूपांतर मतात कशी करतात हे देखील पाहणू महत्वाचे ठरणार आहे.

बी आर एस नेते भगीरथ भालके यांना मानणारा वर्ग देखील तालुक्यात आहे.लोकसभेसाठी अध्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे त्यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे.तर उमेदवाराच्या स्पर्धेतील लक्ष्मण ढोबळेची कन्या कोमल ढोबळे यांना डावलल्यामुळे त्यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com