ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : असे कोण म्हणाले वाचा सविस्तर 

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : असे कोण म्हणाले वाचा सविस्तर 

सोलापूर : कोरोना देशात इम्पोर्ट म्हणजेच आयात केलेला आजार आहे. ज्या कुटुंबात कोविडने बळी गेला असेल, त्या कुटुंबीयाने पंतप्रधानांवर 302चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी लोकांना बंदी घालण्याऐवजी त्यांना परवानगी दिली. वास्तविक पाहता, त्यांना मनाई करण्याची सूचना होती. तरीही त्यांना भारतात येऊ दिले. त्याचा फटका देशाला बसला आहे, असा आरोप त्यांनी केला. 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डिझेल व पेट्रोलचे भाव उतरले असताना भारतात मात्र त्याचे दर दिवसेंदिवस वाढवले जात आहेत. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगारांचे सरकार आहे. खडखडाट असलेली तिजोरी भरण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहेत, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लॉकडाउनमुळे बारा बलुतेदारांच्या व्यवसायावर बंदी आली. आवश्‍यक असलेल्या वस्तूंचा व्यवसाय ठप्प झाला. बारा बलुतेदार व्यावसायिकांची उपासमार झाली. त्यांना काहीही दिले नाही. केंद्र सरकारच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये या बारा बलुतेदारांना स्थान नाही. शासन दुर्लक्ष करत आहे, अशी टीका ऍड. आंबेडकर यांनी केली. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मनोरुग्ण निर्माण केले. मोठ्या संख्येने मनोरुग्ण वाढले आहेत. त्या अनुषंगाने या आजारावरील पेशंट वाढल्याचे दिसून येते. 
कोरोना महामारीच्या नावाखाली शासनाने सर्वसामान्य माणसांना ब्लॅकमेल केले आहे. त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त केले. आज बापात बाप नाही, लेकात लेक नाही, कुणी एकमेकांना घरात येऊ देत नाही, कुणी दुसऱ्याच्या घरात जात नाही. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शासनाची वाट सर्वसामान्य लोकांनी बघू नये. आपले आनंदी जीवन जगावे, असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले. केंद्र व राज्यात राजकीय नेतृत्व नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकांचे प्रश्‍न जैसे थे आहेत. त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झालेय. या प्रश्‍नाकडे म्हणूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ऍड. आंबेडकर यांनी केला. 
पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्‍ते नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे, विक्रांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com