पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण अंगलट!

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण अंगलट! 39 जणांविरुद्ध गुन्हे
Solapur Crime
Solapur Crimeesakal
Summary

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रितपणे फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रितपणे फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही, या आदेशाचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याप्रकरणी सदर बझार पोलिस (Sadar Bazar Police Station), एमआयडीसी पोलिस (MIDC Police Station), जोडभावी पेठ (Jodbhavi Peth Police Station), जेलरोड पोलिसांनी (Jailroad Police Station) कारवाई केली. 39 आयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे (Crime) दाखल केले आहेत. (Filed a case of gathering a crowd by broadcasting the Prime Minister's program live)

Solapur Crime
मोहोळ तालुक्‍यातील 'त्या' तलाठ्यांची होणार चौकशी!

हुतात्मा स्मृती मंदिरात (Hutatma Smruti Mandir) रवी सिद्राम गोणे, संतोष वेदपाठक यांनी तब्बल 550 लोकांना प्रवेश देऊन महापालिका आयुक्‍तांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. त्यामुळे सदर बझार पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, कोरोना काळात विनापरवाना आंदोलन (Agitation), निर्दशने, सभा, संप करण्यास बंदी आहे. तरीही, एमआयडीसी परिसरातील संगमेश्‍वर नगरातील माऊली मंदिराजवळ सार्वजनिक रोडवर काहीजणांनी आंदोलन केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अक्षय आडम, गणेश पवार, अमरिश बरडे, योगेश सोनवणे, रोहन गायकवाड, आकाश काळे, ओंकार पुंजाल, बबलू चव्हाण, राहुल जन्मले, अजय शहापुरे, पुष्पक अडगळे, अमोल कोळी, प्रतीक गायकवाड, अमोल उम्रानी, कृष्णा चिंचोळे, राहुल कलशेट्टी, वरुण सोमशेट्टी व मयूर क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. तसेच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येईल असा स्टेज मारून बेकायदेशीर जमाव जमवून कार्यक्रम घेतल्याप्रकरणी आनंद मुसळे, विनायक नामाजी, सुनील जाधव, सिद्राम नागठाणे यांच्याविरुद्धही एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण अंगलट

पूर्व मंगळवार पेठेतील स्वामी समर्थ मठाजवळ खुर्च्या टाकून 'दिव्य काशी, भव्य काशी' (Divya Kashi, Bhavya Kashi) कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट लोकांना दाखवण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमविल्याने गणेश राजकुमार साखरे, सचिन अशोक कुलकर्णी यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच घोंगडे वस्तीतील नीलकंठेश्‍वर मंदिरात असाच बेकायदेशीर कार्यक्रम आयोजित केल्याने जगदीश व्हड्राव, नागेश दुर्गम, सुधाकर नराल यांच्याविरुद्धही जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अशाच प्रकारचा कार्यक्रम श्री पंचमुखी हनुमान देवस्थान आवारात (अशोक चौक) घेतल्याने अनिल कंदलगी, जय साळुंखे, नागनाथ सोमा, नागेश सरगम, भूपती कमटम, मोहन स्वामी कुरापाटी, यादगिरी बोम्मा, सत्यनारायण दुर्गम, स्वामी कुडक्‍याल यांच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Solapur Crime
सोलापूर : शिंगणापूर घाटातील खोल दरीत कोसळली कार! माय-लेकराचा मृत्यू

शहरात 29 डिसेंबरपर्यंत जमावबंदी

सोलापूर शहरातील (Solapur City) कोरोना आटोक्‍यात येत असतानाच 18 वर्षांवरील सर्वांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस नियोजन केले जात आहे. तरीही, महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई केली जात आहे. शहरातील जमावबंदीचे आदेश 37 (3) 15 ते 29 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात पाच अथवा त्याहून अधिक व्यक्‍तींनी विनापरवाना एकत्रित येण्यावर पोलिस उपायुक्‍त बापू बांगर (Bapu Bangar) यांनी निर्बंध घातल्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com