3Drowning_696x462.jpg
3Drowning_696x462.jpg

फिल्मिस्टाईल थरार ! रंगपंचमीच्या सुट्टीनिमित्त तिघांनी केली पार्टी; जेवणानंतर शेततळ्यात गेले पोहायला; एक वाचला तर दुसरा बुडाला

Published on

सोलापूर : पोहायला येत नसतानाही शेततळ्यात उतरलेल्या दोघांपैकी एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. राजू रिकमल्ले (वय 24) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे.

तपास अंमलदार म्हणाले...

  • शहरातील साईबाबा चौक परिसरातील तीन मित्र रंगपंचमीची सुट्टी असल्याने पार्सल घेऊन गेले पार्टीला
  • तिघेही टॉवेल कारखान्यात आहेत मजूर; रंगपंचमीची सुट्टी असल्याने शहरातून जेवण पार्सल घेऊन गेले होते शहराबाहेर पार्टीला
  • शहरापासून दूर अंतरावरील उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथील एका शेतातील झाडाखाली केले जेवण
  • जेवणानंतर घरी येताना त्यांना दिसले शेततळे; पोहायला येत नसल्याने विनायक हा तळ्यात उतरलाच नाही
  • तलाव खूप खोल नसेल म्हणून राजू व बालाजी हे दोघे खाली उतरले; शेवाळ्यावरून घसरून दोघेही तलावात गेले
  • दोन्ही मित्र बुडत असल्याने विनायकने जवळील ताडपत्री टाकली पाण्यात; बालाजी ताडपत्रीला धरून वरती आला
  • राजू रिकमल्ले हा 24 वर्षीय तरुण पाण्यात बुडाला; दोघांचेही नोंदविले जबाब

रंगपंचमीची सुट्टी असल्याने टॉवेल कारखान्यात मजूर म्हणून काम करणाऱ्या तीन मित्रांनी पार्टीचा बेत केला. शहरातील हॉटेलमधून जेवण पार्सल घेऊन उळे (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात गेले आणि एका झाडाखाली बसून त्यांनी जेवण केले. त्यानंतर जवळील एका शेततळ्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. विशेष म्हणजे त्या तिघांनाही पोहायला येत नव्हते. त्यातील विनायक नावाच्या तरूणाने तळ्यात न उतरता वरतीच थांबणे पसंत केले. राजू व बालाजी हे दोघे शेततळ्यात उतरताना शेवाळ्यावरून घसरले आणि तलावात बुडू लागले. त्यानंतर प्रसंगावधान साधून विनायक याने जवळील तापडपत्री तळ्यात टाकली आणि त्याला धरून बालाजी हा वरती आला. मात्र, तोवर राजू हा तळात गेला होता, तो पुन्हा वर आलाच नाही. त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आला आहे.

राजूची आई आहे विडी कामगार
शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या राजूची आई विडी कामगार आहे. तर वडीलही टेक्‍स्टाईल उद्योगात कामगार आहेत. त्याला दोन भाऊ असून तेही कामगारच आहेत. राजूचा विवाह झाला नव्हता, त्याचा आई-वडिलांना मोठा आधार होता. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मनोज भंडारे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com