'अंतिम' परीक्षेचा निकाल 31 ऑक्‍टोबरला ! प्रथम, द्वितीय वर्षातील बॅकलॉगची परीक्षा 1 ते 6 नोव्हेंबरला 

3Students_20exam_201.jpg
3Students_20exam_201.jpg
Updated on

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व्हर क्रॅश असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार सायबरकडे गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करुनही विद्यापीठाने 99 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. 99.86% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तर 0.14 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. 133 विद्यार्थीच ऑफलाईन परीक्षेसाठी बसल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण केली. राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठापैकी सोलापूर विद्यापीठ परीक्षा पूर्ण करण्यात राज्यात अव्वल ठरले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 99 हजार 970 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रारंभी 5 ऑक्‍टोबरपासून विद्यापीठाने एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेतल्या. त्यानंतर 12 ऑक्‍टोबरपासून अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. दरम्यान, विविध कारणांमुळे पाच टक्के विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. तर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 


विद्यापीठाकडून... 

  • अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 31 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर केले जातील 
  • पाच टक्‍के विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे देऊ शकले नाहीत परीक्षा 
  • प्रथम व द्वितीय वर्षातील बॅकलॉग विद्यार्थ्यांची होणार 1 ते 6 नोव्हेंबरपर्यंत परीक्षा 
  • राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण करण्यात मारली बाजी 
  • प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार


5 ऑक्‍टोबरची परीक्षा 24 ऑक्‍टोबरला 
तांत्रिक अडचणीमुळे 5 ऑक्‍टोंबर रोजी एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा 24 ऑक्‍टोबरला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. यशस्वीरीत्या परीक्षा पूर्ण केलेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊन शकलेल्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा लवकरच घेतली जाईल, असेही विद्यापीठाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mangalwedha Water Crisis Deepens As Shirnandgi Lake Dries Up And 11 Transformers Lose Power Affecting Farm Crops
Solapur Zilla Parishad Audit Flags 2 Point 13 Crore Rent Paid To 37 Ashram Schools Over Additional Space Claims
solapur district court
boramani murder case
Marathi News Esakal
www.esakal.com