
सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैसे कपात केले आहे. कपात केलेले पैसे कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेला मिळणे आवश्यक होते, पतसंस्थेला ही रक्कम न मिळाल्याने पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्याने पतसंस्थेने वसुलीच्या दाखल्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेतली आहे.