Solapur News : भाजपच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा; माजी महापौर कोठेंनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

रस्ते कामाच्या उद्‌घाटनाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी माजी महापौर महेश कोठे, त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा यांच्यासह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
भाजपच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
भाजपच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हाSakal

सोलापूर : रस्ते कामाच्या उद्‌घाटनाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी माजी महापौर महेश कोठे, त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा यांच्यासह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

सोमवारी (ता. ११) विठ्ठल कोटा (रा. जुना विडी घरकूल) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून भाजपच्या सात जणांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.

विडी घरकूल परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणावेळी भाजप व माजी महापौर महेश कोठे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दोन वर्षांपासून अडवणुकीमुळे थांबलेल्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना श्रेयवादावरून हा प्रकार झाला.

या प्रकरणात कोठेंसह इतर काहीजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर महेश कोठे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन हकीकत सांगितली. निवडणुकीमुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तो रस्ता आम्हीच केला म्हणून त्याठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

पण, आमची काहीही चूक नसताना आमच्याविरुद्धच गुन्हा दाखल झाल्याची खंत बाळगून कोठेंनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांनी त्यावेळी वस्तुस्थिती जाणून घेतली. सोमवारी विठ्ठल कोटा यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून शिवानंद पाटील, सतीश भरमशेट्टी, सुशांत भरमशेट्टी, अंबादास म्हंता, राजकुमार हंचाटे, राजू हिबारे व राजेश मासम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शिवानंद पाटलांची चिथावणी अन्‌...

जुना विडी घरकूल येथील वैष्णव मारुती चौकातील रस्त्याच्या कामाच्या उद्‌घाटनावेळी शिवानंद पाटील यांनी चिथावणी दिली. त्यानंतर संशयित आरोपी सतीश भरमशेट्टी व सुशांभ भरमशेट्टी यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावरील दगड मारुन जखमी केले व दत्तात्रय जावळे हे भांडण सोडवत असताना त्यांनाही तुला सोडणार नाही, अशी दमदाटी केली असे विठ्ठल कोटा यांच्या फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुकडे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com