माजी आमदार पुत्राविरुद्ध सोलापुरात गुन्हा

FIR against Rajesh Patil
FIR against Rajesh Patil
Updated on

सोलापूर : केबल व्यवसाय परवडत नसून तुम्हीच हा धंदा विकत घ्या असे म्हटल्याने राजेश सिद्रामप्पा पाटील यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण केली आणि त्यामध्ये डाव्या डोळ्याला व उजव्या गालावर जखम झाल्याची फिर्याद नरेश महादेव लायणे (रा. विजयपूर रोड, सैफूल परिसरातील रामनारायण चंडक विहार) यांनी पाटील याच्यासह दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. राजेश पाटील हे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
केबल व्यवसायाच्या देवाणघेवाणीवरून संशयित आरोपी राजेश पाटील यांनी नरेश लायणे यांना होटगी रोडवरील राहत्या घरी बोलावले. त्यानुसार लायणे हे त्यांचे मित्र इक्‍बाल समशोद्दीन शेख यांच्यासमवेत त्यांच्याकडे गेले. त्या वेळी मला केबल व्यवसाय परवडत नसून हा धंदा तुम्हीच विकत घ्या, असे लायणे म्हणाले. त्यानंतर चिडलेल्या पाटलांनी व त्यांच्या वाहनचालकाने लायणे यांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत लायणे यांच्या डाव्या डोळ्यावरील भुईजवळ जखम झाली. तर उजव्या गालावरही जखम झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (ता. 18) होटगी रोड पेक्‍स हॉस्पिटलमागे घडली. या प्रकरणात सोमवारी (ता. 20) दुपारी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक टंकसाळी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Strategy Meets Personal Bond: Deshmukh Joins Raut’s Campaign Drive
Behind-the-Scenes Power Play Returns as Council Election Equations Shift
solapur
Hydro-Crisis Resolved: Ujani Canal Water Finally Injected into Man River Bed
Marathi News Esakal
www.esakal.com