मोहोळ: मोहोळ बसस्थानकावर प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेट घेतल्याने बसचे इंजिन आणि चालकाच्या आसनाजवळील भाग जळून पूर्णपणे नष्ट झाला. सुदैवाने चालक आणि वाहकांच्या त्वरित कारवाईमुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही..सांगोला डेपोच्या (क्रमांक MH-11 BL 9451) बसने सांगोला-हैदराबाद मार्गावर मोहोळ बसस्थानकावर सकाळी १२ वाजता थांबली. त्यावेळी बसचालक सुनिल काशीद यांना इंजिनमधून धूर येताना दिसला. त्यांनी लगेच वाहक विजय बंडगे यांना सांगितले आणि दोघांनी प्रवाशांना बसमधून गडबडीने बाहेर उतरवले..Solapur Indira Gandhi Stadium: इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी अडथळे.याचदरम्यान इंजिनमध्ये आगीने पूर्णपणे पेट घेतला. तसेच या बसमध्ये एकूण ६९ (मोठे) आणि ४ (लहान) असे एकूण ७३ प्रवासी होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक नियंत्रक, एसटी कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्नांमुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही आणि बसस्थानकातील बस सेवा सुरळीत केली..बस पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपास उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते जिब्राईल शेख, चंदू गोडसे, सोमनाथ पवार, शैलेश स्वामी, बिलाल शेख, पिण्याचे पाणी घराघरात पुरवणारे शुभम शेटे, स्थानिक 'एसटी' कर्मचारी तानाजी गायकवाड, बबलु देसाई, वाहतूक नियंत्रक दादा उन्हाळे, पोलिस वाहतूक व्यवस्थेचे संजय नेमाजी, महादेव रोडे यांच्यासह अनेकांनी तात्काळ आग आटोक्यात आणली आणि बसस्थानकातील बस सेवा सुरळीत केली..बसस्थानकात नोंद करण्यासाठी उतरल्यानंतर, मला इंजिनमधून धुर येत असल्याचे आणि आग लागल्याचे लक्षात आले. त्वरित वाहक विजय बंडगे याला ओरडून सांगत, आम्ही दोघांनी प्रवाशांना गडबडीने बसमधून खाली उतरायला सांगितले आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ही आग इंजिनमधील वायरच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असावी."सुनिल विलास काशीद, बसचालक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.