
सोलापूर : येथील पत्रकार भवन चौकात पाच जणांनी दुधाचा टेम्पो अडवून चालकास मारहाण केली आणि दहा हजारांची रोकड, कागदपत्रे, चांदीचे ब्रेसलेट चोरले होते. सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या आठ तासांत त्या पाच संशयितांना जेरबंद केले आहे. त्यातील संशयित आरोपी महेश राम भंडारे (रा. जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी) याचा ३ मार्चला वाढदिवस होता आणि त्यावेळी पाच जणांनी मद्यपान केले होते. त्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.