कोव्हिड रुग्णालय परिसरात विनाकारण फिराल तर पाचशे रुपये दंड !

कोव्हिड रुग्णालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड
Covid Center
Covid CenterMedia Gallery
Updated on
Summary

रुग्णालयातील रुग्ण, डॉक्‍टर, नर्स व त्यांचे सहकारी, रुग्णालयाशी संबंधित कर्मचारी, मेडिकल, ऑक्‍सिजन पुरवठादार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणासही रुग्णालयाच्या परिसरात वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) प्रसाराचे माध्यम पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी नवीन आदेश काढत कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एका संक्रमित रुग्णाकडून इतर व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्याने कोरोनाची (Corona) बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. (Five hundred rupees fine for wandering in Covid hospital premises without any reason)

Covid Center
"उजनी'चा आदेश रद्द करण्याचे श्रेय शरद पवार व शेतकऱ्यांनाच !

रुग्णाचे नातेवाईक दवाखान्या बाहेर गर्दी करतात. त्याचप्रमाणे कोव्हिड वॉर्डात रुग्णांना भेट देण्यास जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सोलापूर जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर (Dedicated Covid Health Center), डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospital), कोव्हिड केअर सेंटर (Covid Care Center) मध्ये रुग्णालयातील रुग्ण, डॉक्‍टर, नर्स व त्यांचे सहकारी तसेच रुग्णालयाशी संबंधित कर्मचारी, मेडिकल, ऑक्‍सिजन (Oxygen) पुरवठादार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणासही रुग्णालयाच्या परिसरात विनाकारण उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Covid Center
आता लढा इंदापुरातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी : देशमुख

रुग्णालय व परिसरात कोणताही व्यक्ती विनाकारण फिरणार नाही, गर्दी करणे, वॉर्डमध्ये भेटायला जाण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिव्यक्ती पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. रुग्णाचे नातेवाईक अथवा अन्य व्यक्तींकडून रुग्णालयांमध्ये बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. रुग्णाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना रुग्णालयात व रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयाच्या परवानगीशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित रुग्णालयात केवळ नेमणूक केलेल्या रुग्णाचे नातेवाईक यांनाच अत्यावश्‍यक कामाकरिता दवाखान्याच्या व्यवस्थापनाच्या परवानगीने प्रवेश राहील. त्यासाठी हॉस्पिटलचे ओळखपत्र बंधनकारक असेल इतरांना (रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्स व त्यांचे सहकारी वगळून) प्रवेश असणार नाही अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आदेशात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com