सोलापुरात कोरोनामुळे आज पाच जणांचा मृत्यू, 64 कोरोना बाधित

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील पाच व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे नवीन 64 रुग्ण सापडल्याने सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 1144 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 99 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

जुना विडी घरकुल परिसरातील 78 वर्षीय पुरुषाला 29 मे रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 3 जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. जोडभावी पेठ परिसरातील 59 वर्षीय पुरुषाला 1 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 4 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांचे निधन झाले आहे. न्यू बुधवार पेठ परिसरातील 54 वर्षीय पुरुषाला 29 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 4 जून रोजी पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. अशा नगर एमआयडीसी रोड परिसरातील 69 वर्षीय  पुरुषाला दोन जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 4 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. मुरारजी पेठ परिसरातील 78 वर्षीय महिलेला दोन जून रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 3 जून रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

आज नव्याने आढळलेल्या 64 रुग्णांमध्ये रविवार पेठेतील नव कल्याण नगर येथील एक पुरुष व एक महिला,  मुरारजी पेठ येथील एक महिला, जुना विडी घरकुल येथील एक पुरुष व  एक महिला, बुधवार पेठेतील दोन पुरुष, साखर पेठेतील एक महिला, डफरन क्वॉर्टर येथील एक पुरुष व एक महिला, जोडभावी पेठ येथील एक पुरुष, भवानी पेठेतील तीन पुरुष व तीन महिला,  विजापूर रोडवरील बेघर सोसायटीतील एक पुरुष, विजापूर नाका येथील एक पुरुष, आसरा मंत्री चंडक इस्टेट येथील एक पुरुष,  रेल्वे लाइन्स येथील एक पुरुष, विनायक नगर एमआयडीसी येथील एक पुरुष, अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर येथील एक पुरुष, विजापूर रोडवरील यामिनी नगर येथील एक पुरुष, शुक्रवार पेठेतील एक पुरुष, दाजी पेठेतील एक महिला, भागवत टॉकीजजवळील एक पुरुष, सदर बझार लष्कर येथील एक पुरुष, अक्कलकोट रोडवरील एक पुरुष, मार्केट यार्ड जवळील एक पुरुष, आशा नगर एमआयडीसी रोड येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील एक महिला, एकता नगर येथील एक महिला, निलम नगर येथील एक पुरुष, नागनाथ सोसायटी एमआयडीसी येथील एक महिला, मोदीखाना येथील एक महिला, इंदिरा नगर विजापूर रोड येथील एक पुरुष, गुरुनानक चौकातील एक पुरुष, स्वप्नपूर्ती सर्वोदय हाऊसिंग सोसायटी येथील एक पुरुष, कुंभारी येथील चंद्रोदय नगर मधील एक पुरुष व  एक महिला, कुंभारी विडी घरकुल येथील पाच पुरुष व तीन महिला, कुंभारी नवीन विडी घरकुल येथील तीन पुरुष व पाच महिला, बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एक पुरुष, बार्शी तालुक्यातील जामगाव येथील तीन पुरुष, बार्शीतील आगळगाव रोडवरील वाणी प्लॉट येथील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील पारधी वस्ती मधील एक पुरुष आणि पंढरपुरातील अनिलनगर येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com