विजयपूर रोड परिसरात पाच रुग्ण ! आज 27 पॉझिटिव्ह; रुग्णालयात उशीरा दाखल झालेल्या दोघांचा मृत्यू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

31Corona_20akola_2001_1_3.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख आठ हजार 47 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत नऊ हजार 874 व्यक्‍तींना झाली कोरोनाची बाधा 
  • शहरातील आठ हजार 882 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सध्या 442 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; आतापर्यंत 550 जणांचा झाला मृत्यू 

विजयपूर रोड परिसरात पाच रुग्ण ! आज 27 पॉझिटिव्ह; रुग्णालयात उशीरा दाखल झालेल्या दोघांचा मृत्यू 

सोलापूर : शहरात सणासुदीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. संशयितांनी वेळेत दवाखान्यात दाखल व्हावे, असे आवाहन करुनही उशिराने दाखल झालेल्या अनोळखी 50 वर्षीय व्यक्‍तीचा आणि भागवत टॉकिज परिसरातील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एक हजार 72 रिपोर्टमध्ये 27 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख आठ हजार 47 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत नऊ हजार 874 व्यक्‍तींना झाली कोरोनाची बाधा 
  • शहरातील आठ हजार 882 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सध्या 442 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; आतापर्यंत 550 जणांचा झाला मृत्यू 


शहरात आज मोदीखाना (रेल्वे लाईन), विद्या नगर, आदर्श चौक, जागृती मंदिरामागे (शेळगी), शिवाजी नगर, वाणी गल्ली (बाळे), टीबी वॉर्ड (सर्वोपचार रुग्णालय), लिमयेवाडी, रामवाडी, भवानी पेठ (मड्डी वस्ती), निर्मला विहार, माशाळे नगर, राजस्व नगर (विजयपूर रोड), फौजदार चावडीजवळ, आरटीओ ऑफिसजवळ, कृषी नगर (होटगी रोड), विश्राम सोसायटी, कांबळे नगर (मजरेवाडी), आनंद नगर, मंजुनाथ नगर, टिळक चौक आणि महाराणा प्रताप नगर (कुमठा नाका) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात रुग्णांच्या संपर्कातील 102 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 55 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत आणि 24 जण होम आयसोलशेनमध्ये आहेत.

loading image
go to top