Mohol Crime : मोहोळ येथे चार लाख चौसष्ट हजाराची सुगंधी तंबाखु जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मांडवे वस्ती (मोहोळ) येथे 4 लाख 64 हजाराचा विना लेबल सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आल्याप्रकरणी एका जणावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
tobacco seized in mohol

tobacco seized in mohol

sakal

Updated on: 

मोहोळ - मांडवे वस्ती (मोहोळ) येथे 4 लाख 64 हजाराचा विना लेबल सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आल्याप्रकरणी एका जणावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ता 13 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता निदर्शनास आला. या प्रकरणी ता. 14 रोजी मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुधाकर प्रभु मांडवे रा. मांडवे वस्ती, मोहोळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com