
पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी पंढरपुरातील चंद्रभागेत पोचले आहे. मंगळवारी सायंकाळी चंद्रभागेच्या काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. जुना दगडी पूलही पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांनी स्नानासाठी चंद्रभागेच्या पात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.