
पंढरपूर, ता.२६: नीरा व भीमा नदीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी (ता.२६) दुपारी पंढरीतील दगडी पुल पाण्याखाली गेला असून पुलावरून ३५ ते ४० हजार क्युसेसने पाणी वाहत आहे. नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने वेढले असून नदी तीरावरील बहुतांश घाटावरील काही पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी पंढरपूर नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.