सोलापूर-पुणे दोन हजारांचे भाडे! प्रवाशांची लूट टाळण्यासाठी 'शिवशाही'

सोलापूर-पुणे दोन हजारांचे भाडे! प्रवाशांची लूट टाळण्यासाठी 'शिवशाही'
सोलापूर-पुणे दोन हजारांचे भाडे! प्रवाशांची लूट टाळण्यासाठी 'शिवशाही'
सोलापूर-पुणे दोन हजारांचे भाडे! प्रवाशांची लूट टाळण्यासाठी 'शिवशाही'esakal
Updated on: 
Summary

सोलापूर ते पुणे हा प्रवास पाचशे रुपयांचा असतानाही खासगी वाहने प्रवाशांकडून दोन ते अडीच हजार रुपयांचे भाडे घेऊ लागले आहेत.

सोलापूर : सोलापूर (Solapur) ते पुणे (Pune) हा प्रवास पाचशे रुपयांचा असतानाही खासगी वाहने प्रवाशांकडून दोन ते अडीच हजार रुपयांचे भाडे घेऊ लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबावी या हेतूने सोलापूर आगारातून 10 शिवशाही बस (Shivshahi Bus) भाडे तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. सोलापूर ते पुणे आणि बार्शी (Barshi) ते पुणे या मार्गावर या शिवशाही बस धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड (Vilas Rathod) यांनी दिली.

सोलापूर-पुणे दोन हजारांचे भाडे! प्रवाशांची लूट टाळण्यासाठी 'शिवशाही'
Jio युजर्सना आणखी एक धक्का! 'हे' 4 महत्त्वाचे प्रीपेड प्लॅन्स बंद

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. अजूनही 74 हजारांपर्यंत कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनातून प्रवास करीत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी वाहनांकडून भरमसाठ भाडे आकारले जात आहे. एसटी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व त्यांची लूट होऊ नये म्हणून सोलापूर विभागाने भाडे तत्त्वावर शिवशाहीच्या माध्यमातून बससेवा सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद असून जवळपास प्रत्येक तासाला एक बस धावत आहे. एसटी वाहतूक बंद असल्याने खासगी वाहतूक मालामाल झाल्याची स्थिती पहायला मिळत आहे. दरम्यान, प्रवाशांकडून भरमसाठ भाडे घेणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विशेष पथकांची नियुक्‍ती केली आहे. परंतु, त्या पथकांचा अजूनपर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. तर माल वाहतूक वाहनांमधूनही बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी एसटी सेवा सुरू व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

खासगी वाहनधारकांकडून सर्वसामान्य प्रवाशांची लूट सुरू आहे. त्यामुळे महामंडळाकडून भाडेतत्त्वावर सोलापूर आगारात शिवशाहीच्या माध्यमातून बससेवा सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील दोन मार्गांवर दहा बस सुरू आहेत. प्रवाशांची गरज आणि बसची उपलब्धता पाहून त्यात वाढ होईल.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

सोलापूर-पुणे दोन हजारांचे भाडे! प्रवाशांची लूट टाळण्यासाठी 'शिवशाही'
महापरिनिर्वाण दिन साधेपणानेच! पासशिवाय नो एंट्री, दोन डोसचेही बंधन

महामंडळाच्या योजना 'शिवशाही'लाही लागू

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, पासधारकांना शिवशाहीतून सवलतीत प्रवास करता येईल. सध्या सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर, बार्शी-पुणे आणि पुणे-बार्शी या मार्गावर शिवशाही बस धावत आहेत. एसटी महामंडळाने ज्या घटकांना सवलत दिली आहे, त्यांना शिवशाहीतून सवलतीत प्रवास करता येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक राठोड यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com