
पांगरी: येडशी अभयारण्यात वावरणाऱ्या वाघाने आपला मोर्चा बार्शी तालुक्याकडे वळवला असून, गेल्या आठ दिवसांपासून त्याने कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला केला नसल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे रेस्क्यू पथकाच्या टीमने ड्रोनच्या साह्याने रात्रीच्या वेळी शोधमोहीम हाती घेतली असली, तरी अद्याप वाघाचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे तो अभयारण्य सोडून पूर्वीच्या वावरलेल्या बार्शी तालुक्यात परतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.