
Solapur: टिपेश्वर अभयरण्यातून येडशी अभयारण्यात आलेला वाघ पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयाने २८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीने आदेश दिला होता. या आदेशास अनुसरून वाघाला पकडण्यासाठी आता फक्त १५ दिवसांची मुदत राहिली आहे. मागील ५५ दिवसांत या वाघाने २८ पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे.