
मोहोळ तालुक्यातील वीज तोडणी विरोधात भाजपने शेतकर्यांसोबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
माजी मंत्री ढोबळे म्हणाले, जयंत पाटील यांच्या दारावरून गेलो तरी डायबेटिस होतो
सोलापूर : सूरज जाधव या शेतकर्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे सभागृहात राजकारण न करता आमदार यशवंत माने हे तालुक्यातील राज्यातील वीज तोडणी थांबवू शकले असते. पण, ते तसे करू शकले नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) खूप गोड बोलतात. त्यांच्या घरासमोरून जरी कोणी गेले तर त्याला सुद्धा डायबेटिस होतो, अशी टीका माजी मंत्री भाजप नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी केली. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे हे सरकार आज शेतकरी अडचणीत आला असून तो आत्महत्या करतोय, तरीही वीज तोडणी थांबवू शकत नसल्याचा समाचार त्यांनी यावेळी घेतला.
हेही वाचा: वादग्रस्त विधानाने अडगळीतील ढोबळे पुन्हा चर्चेत ! शिंदे म्हणाले...
मोहोळ तालुक्यातील वीज तोडणी विरोधात भाजपने शेतकर्यांसोबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे, सुशील क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी ढोबळे यांनी आमदार यशवंत माने यांच्यासह माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. पाच राज्यातील निवडणूक निकालाबाबत सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले.
हेही वाचा: गेल्या 35 वर्षांत नेत्यांना मी शिस्त लावू शकलो नाही : ढोबळे
हात जोडून आता निवेदन, पुन्हा टेबल पालथा करू
तालुक्यातील शेतकरी अडचणीत असतानाही महावितरणकडून शेतीपंपाची वीज तोडली जात आहे. या सरकारला शेतकर्यांचे काहीच देणेघेणे नाही. आता आम्ही फक्त हात जोडून विनंती करून निवेदन देत आहोत. तरीही, कारवाई न थांबल्यास टेबल पालथा करू, असा इशारा माजी मंत्री ढोबळे यांनी यावेळी दिला.
Web Title: Former Minister Laxman Dhoble Said Even If He Goes Through Jayant Patil Door Diabetes Happens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..