esakal | माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन

बोलून बातमी शोधा

Anuradha Dhobale

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे (former minister Pro. Laxmanrao Dhoble) यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे (Anuradha Dhoble) यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी (ता. 4) पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 58 वर्षांच्या होत्या. (former minister laxman dhoble's wife anuradha dhoble passed away)

सावली वूमेन्स फाउंडेशनच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या मागे पती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मुलगा अभिजित ढोबळे, सून शारोन अभिजित ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा परिवार आहे.

त्या शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शकही होत्या. संस्थेच्या कामकाजावर त्यांनी लक्ष ठेवून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांवरील सांसारिक तणाव कमी करावा यासाठी विविध उपक्रम राबविले. महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तर महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून जवळपास दहा हजार महिलांना पोस्टाची बचत खाते काढून देण्याचे काम त्यांनी केले.