माजी मंत्र्यांची जीभ घसरली; रागाच्या भरात शेतकऱ्याला दिली शिवी

माजी मंत्र्यांची जीभ घसरली; रागाच्या भरात शेतकऱ्याला दिली शिवी
Updated on
Summary

शेतकऱ्यांनी थकीत उसबिलाची रक्कम मागणी करण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांसोबत बोलण्यासाठी गेलेल्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली.

सोलापूर - अक्कलकोट इथं गेल्या ११ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मातोश्री साखर कारखान्याला उस विकणाऱ्या शेतकऱ्यांनी थकीत उसबिलाची रक्कम मागणी करण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांसोबत बोलण्यासाठी गेलेल्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली. दरम्यान, या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेलेल्या माजी गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धराम म्हेत्रे यांची जीभ घसरली. रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्यांनाच शिवी दिल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्कलकोट इथं म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बोलत असताना मधेच शेतकऱ्यांनी मोठ्याने बोलून अडथळा आणल्यानं रागावलेल्या म्हेत्रे यांनी अपशब्द वापरले. सिद्धराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री पद भूषवलं होतं. तसंच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूकही जिंकली होती.

माजी मंत्र्यांची जीभ घसरली; रागाच्या भरात शेतकऱ्याला दिली शिवी
'आर्यनला अडकवण्याचा कट, गोसावीने 50 लाख ॲडव्हान्सही घेतले'

सिद्धराम म्हेत्रे बोलताना म्हणाले की, सगळे शांत बसा, मी बोलत असताना मधे बोलून कोणाला पुढारीपणा करायचा असेल तर आताच कारखान्याला आग लावतो. तितका मी कडू आहे. या कारखान्यावर माझं पोट भरत नाही, पाच वर्षे... (असं बोलत असतानाच मधेच एक शेतकरी मोठ्याने ओरडला) तेव्हा राग अनावर झालेल्या म्हेत्रे यांनी शेतकऱ्याला शिवी दिली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur
jewellery theft
Safety Alert: Commuters Forced to Take 4km Detour, Rising Accidents on NH-561A
Nitin Gadkari
Marathi News Esakal
www.esakal.com