माजी मंत्री तानाजी सावंत दौरा : शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य अन्‌ अधिकाऱ्यांची धावपळ

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे
Sawant Meeting
Sawant MeetingCanva

पंढरपूर (सोलापूर) : शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत (Former Shiv Sena minister MLA Tanaji Sawant) यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यानंतर आता शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना (Covid-19) काळातील त्यांच्या दौऱ्यामुळे कोरोना उपाययोजनांसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील आता धावपळ सुरू झाली आहे. (Former Minister Tanaji Sawant's visit has created a new consciousness among Shiv Sainiks)

विधानसभा निवडणुकीनंतर आमदार तानाजी सावंत हे पक्ष संघटनेपासून काहीसे बाजूला होते. परिणामी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्ष संघटनेत मरगळ निर्माण झाली होती. दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेला गतवैभव निर्माण व्हावे, पक्ष संघटन आणखी मजबूत व्हावे यासाठी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्यावर पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी दिल्यानंतर आमदार सावंत यांनी तत्काळ सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

Sawant Meeting
वर्षभर रुग्णोपचार अन्‌ गरजूंना अन्नदान ! "रॉबिनहूड आर्मी'ची कोरोना काळातसुद्धा निरंतर सेवा

आमदार सावंत यांनी बुधवारी (ता. 12) पंढरपूर विभागातील पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, मंगळवेढा या तालुक्‍यातील शिवसैनिकांची पंढरपुरात बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन वाढीविषयी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या "ब्रेक द चेन' या मोहिमेचाही त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर आमदार सावंत यांनी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना संसर्गाविषयाच्या अनेक मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली. त्यानंतर कोरोना साखळी कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचीही त्यांनी माहिती घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या "माझं कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेला मुंबईसह राज्यभरात यश मिळाले आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला असून तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. राज्यात देखील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु अजूनही लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणखी जोमाने काम करण्याची गरज असल्याचेही आमदार सावंत यांनी बैठकीत सांगितले.

Sawant Meeting
महाविकास आघाडी सरकार विरोधात सोलापूरच्या भाजप आमदार-खासदारांची घोषणाबाजी !

या बैठकीला जिल्हा समन्वयक प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, गणेश वानकर, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तुकाराम भोजने, जयवंत माने, युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख आशा टोणपे, महावीर देशमुख, सूर्यकांत घाडगे, नामदेव वाघमारे, सुधाकर लावंड, संजय कोकाटे, रश्‍मी बागल, गणेश इंगळे, पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे, कमरुद्दीन खतीब, समाधान डाक, आरती बसवंती, महावीर अभंगराव, महेश साठे, संजय घोडके, संदीप केंदळे आदी उपस्थित होते.

पुन्हा एकदा कामाचा धडाका

बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवेबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन आमदार तानाजी सावंत यांनी तत्काळ जिल्हाधिकारी मिलिद शंभकर यांची भेट घेऊन वैद्यकीय सेवा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. आमदार तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा कामाचा धडाका सुरू केल्याने जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com