

मोहोळ : माजी आमदार राजन पाटील यांची "महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदे"च्या अध्यक्षपदी निवड झाली, तशा आशियाचा लेखी आदेश राज्याचे उपसचिव ए पी शिंगाडे यांनी काढला आहे. हे वृत्त मोहोळ येथे समजतात ठीक ठिकाणी या निर्णयाचे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या निवडीमुळे माजी आमदार पाटील यांना राज्यमंत्र्याचा दर्जा.
माजी आमदार पाटील हे सहकारातील मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांचे वडील स्व. बाबुराव (अण्णा) पाटील यांच्या कडून त्यांना सहकाराचे बाळ कडू मिळाले आहे. माजी आमदार पाटील यांची विविध सहकारी संस्था चालविण्यात व त्या आर्थिक सक्षम करण्यास त्यांचा हातखंडा आहे.
तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटया, दूध संस्था, खरेदी-विक्री संघ,पतसंस्था यावर त्यांची आजही मजबूत पकड आहे. या पदावर माजी आमदार पाटील यांची नियुक्ती केल्याने त्यांना काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान या पदाच्या माध्यमातून सहकारी चळवळीशी संबंधित सर्व बाबीवर शासनाला सल्ला देणे, सहकार चळवळीचा आढावा घेणे, समन्वयाचा मार्ग सुचविणे, सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाय सुचविणे, सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी धोरणे सुचविणे, महामंडळा मार्फत कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास हाती घेणे यासह अन्य उपाय योजना कराव्या लागणार आहेत. या निवडीमुळे माजी आमदार पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा ता 22 रोजी मोहोळ येथे आली होती. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सत्ता असो वा नसो पक्षाचे काम कायम सुरू ठेवलेले राजन पाटील हे एकमेव नेते आहेत. परंतु त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कमी पडलो. मात्र त्यांना योग्य मानसन्मान देण्याचे काम आम्ही करू असे सुतवाच केले होते. त्याचेच हे फलित असल्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.