मंगळवेढा - गावगाड्यातील मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायतीच्या 79 गावाच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुन्हा 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात नव्याने काढण्यात येणार आहे. यापूर्वीच्या आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला. त्यांना नव्या आरक्षण सोडतीमुळे त्यांच्या जीवात जीव आला.