ही दोस्ती तुटायची न्हाय ! वर्गमित्राच्या कुटुंबाला लाख मोलाची साथ

ही दोस्ती तुटायची न्हाय ! वर्गमित्राच्या कुटुंबाला लाख मोलाची साथ
वर्गमित्राच्या कुटुंबाला लाख मोलाची साथ
वर्गमित्राच्या कुटुंबाला लाख मोलाची साथ Canva
Updated on: 
Summary

एकुलता एक, हाताला आलेला तरुण मुलगा गेल्याने पाडुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील (Barshi Taluka, Solapur) मळेगाव (Malegaon) येथील शांतकुमार हरिश्‍चंद्र पाडुळे (वय 35) या तरुण शेतकऱ्याचा आपल्या द्राक्ष बागेतील फवारणीच्या तयारीला असताना विजेचा धक्का लागून जागेवरच मृत्यू झाला. एकुलता एक, हाताला आलेला तरुण मुलगा गेल्याने पाडुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही दुःखद घटना समजताच कर्मवीर ना. मा. गडसिंग गुरुजी विद्यालयात शांतकुमारसोबत शिक्षण घेतलेले 2000-01 च्या दहावी बॅचचे वर्गमित्र मदतीला धावून आले आहेत.

वर्गमित्राच्या कुटुंबाला लाख मोलाची साथ
ग्रामीण भागातही वाढली जातिवंत श्वानांची क्रेझ !

वर्गमित्राच्या अचानक जाण्याने पाडुळे कुटुंबावर आभाळ कोसळून कुटुंबाचा एकमेव असलेला आधार नाहीसा झाला आहे. अशा वेळी वर्गमित्र उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, संताजी आलाट (महाराष्ट्र पोलिस), मेजर पद्मसिंह गडसिंग, मेजर सचिन वायकर, श्रीहरी दळवी यांनी व्हॉटसऍप ग्रुपवर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद देत वर्गमित्रांनी एक लाख सात हजारांची मदत गोळा केली. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, बार्शी शाखेत कै. शांतकुमार पाडुळे यांच्या पत्नी राणी पाडुळे यांच्या नावे 50 हजारांची व सुकन्या योजनेतून चार वर्षांची मुलगी सई पाडुळे हिच्या नावे 57 हजारांची रक्कम जमा करण्यात आली. सोमवारी (ता. 2) सर्व वर्गमित्रांनी शांतकुमारच्या घरी जाऊन आई रंजना पाडुळे यांच्याकडे बॅंक पासबुक सुपूर्द करीत मानसिक आधार दिला. शांतकुमारने 35 वर्षाच्या आयुष्यात कमावलेल्या मैत्रीच्या धाग्याने संकटाच्या घडीला पाडुळे कुटुंबाला आर्थिक मदत करून उभारी देण्याचे काम केले, हे अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. सईचे पालकत्व स्वीकारून भविष्यात देखील पाडुळे कुटुंबाला मुलाची उणीव जाणवू देणार नाहीत, असे आश्वासन वर्गमित्रांनी दिले.

वर्गमित्राच्या कुटुंबाला लाख मोलाची साथ
झेडपी अध्यक्ष कांबळे म्हणतात, पंढरपूर जिल्ह्याचा ठराव मजेत झाला !

संकटाच्या समयी जो धावून येतो तोच खरा जिवलग मित्र असतो, हे या वर्गमित्रांनी लाख मोलाच्या मदतीद्वारे दाखवून दिले आहे. या वेळी उमेश घोलप, संताजी आलाट, मेजर पद्मसिंह गडसिंग, तानाजी इंगोले, विशाल चापले, राजकुमार आपुणे, सोमनाथ ढाळे, बालाजी आलाट, दिनेश थोरात, सचिन पवार, बापू पवार, राजाभाऊ गडसिंग, कृष्णा सुरवसे, दुर्गाप्पा धोत्रे, प्रमोद माने, भैय्या माने, विकास सुरवसे, निखील आलाट उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com