Solapur : पुढील महिन्यापासून घरे महाग तर गृहकर्जे स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Loan
पुढील महिन्यापासून घरे महाग तर गृहकर्जे स्वस्त

पुढील महिन्यापासून घरे महाग तर गृहकर्जे स्वस्त

सोलापूर : बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली दरवाढ कमी होण्याची शक्‍यता नसल्याने डिसेंबरपासून नव्या घरासाठी ३०० रुपये प्रति चौरसफूट अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तरीही बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीचा टक्का वाढताच राहिला आहे. आधी बुकींग करणारे ग्राहक या दरवाढीपासून बचावले असले तरी नव्याने बुकींग करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. पुढील महिन्यांपासून नवे दर बाजारात स्थापित होतील असा अंदाज आहे.

शहरात कोरोनानंतर बांधकाम व्यवसायाला चांगली चालना मिळाली होती. आर्थिक संकटे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा घर बांधकामासाठी ग्राहक बाजारात दाखल झालेले होते. पण दिवाळीच्या आधीच सिमेंट व लोखंड साहित्यामध्ये निर्मात्यांनी दरवाढ केली. या दोन्ही साहित्याच्या दरावर सरकारी नियंत्रण नसल्याने ही दरवाढ बांधकाम क्षेत्राला हादरा देणारी झाली आहे.

मात्र, त्याही स्थितीत बांधकाम व्यावसायिकांनी आधी अर्धवट असलेली बांधकामे पूर्ण करत ग्राहकांना ती हस्तांतरित करण्याचे काम केले. त्यानंतर दिवाळीत फ्लॅट किंवा घराच्या बुकिंगचा प्रतिसाद अगदी साधारण होता. मात्र ग्राहकांकडून चौकशी व बांधकामास भेटीचे प्रमाण वाढले. त्यासोबत पुढील काळातील बांधकामाच्या बुकिंगवर भर दिला गेला. अर्थात वाढलेल्या बांधकाम साहित्य दराचा परिणाम बांधकामाच्या अर्थकारणावर गंभीर झाला आहे. तब्बल ३० टक्‍क्‍यापर्यंत बांधकामाचे दर वाढवण्याशिवाय बांधकाम व्यावसायिकासमोर पर्याय नव्हता. अर्धवट गृहप्रकल्प पूर्ण करून नव्या बुकिंग साधारणपणे पुढील महिन्यापासून वाढीव दराने राहणार आहेत.

ग्राहकांचा प्राधान्यक्रम
पुणे हायवे
विजापूर हायवे
जुळे सोलापूर
मंगळवेढा रोड
अक्कलकोट रोड


'बांधकामाचे दर वाढण्याशिवाय प्रतिसाद नाही मात्र ग्राहकांचा प्रतिसाद वाढता आहे. डिसेंबरपासून नव्या घराच्या बुकिंगची संख्या वाढती असणार आहे. या स्थितीत आम्हाला बॅंका, एलआयसी हाउसिंग फायनान्स यांच्या गृहकर्जाच्या संदर्भात वाढता पाठिंबा मिळतो आहे.'
- शशिकांत जिड्डीमनी, अध्यक्ष, क्रेडाई सोलापूर शाखा

loading image
go to top