
प्रभुलिंग वारशेट्टी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावातील बाजारात किरकोळ गृहोपयोगी वस्तू विक्रेत्या राशद अजमोद्दीन तांबोळी यांचा मुलगा ख्वाजा तांबोळी याने कष्ट अन् जिद्दीच्या जोरावर आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत टेनिस बॉल क्रिकेट बॅट उत्पादन व विक्री व्यवसायात यश मिळवले. ख्वाजाने तयार केलेल्या बॅट महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड यांसारख्या राज्यातील खेळाडूंच्या पसंतीस उतरली आहे.