Solapur News : शेतातील राबणूक ते खाकी वर्दीचा मान! लऊळच्या शेतकरीपुत्र प्रीतम लोकरेची SRPF मध्ये निवड

घरात स्पर्धा परीक्षेचा वा नोकरशाहीचा कोणताही वारसा नसताना, शेतात घाम गाळत जिद्दीच्या बळावर प्रीतम लोकरे याने महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाला घातली गवसणी.
Pritam Lokre

Pritam Lokre

sakal

Updated on

लऊळ (सोलापूर) - घरात स्पर्धा परीक्षेचा वा नोकरशाहीचा कोणताही वारसा नसताना, शेतात घाम गाळत जिद्दीच्या बळावर लऊळ (ता. माढा) येथील शेतकरी कुटुंबातील तरुण प्रीतम आजिनाथ लोकरे याने महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाला गवसणी घातली आहे. राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक २०, वरणगाव (जि. जळगाव) येथे त्याची निवड झाली असून, २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्याने हे उज्ज्वल यश संपादन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com