जिवंतपणीच एका युवकाची काढली अंत्ययात्रा; कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल

The funeral was held alive in Solapur
The funeral was held alive in Solapur

सोलापूर : सोलापुरात एका तरुणाची जिवंतपणीच अत्ययात्रा काढली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियार व्हायरल झाला आहे. रंगपंचमी दिवशी सोलापुरातील तुळजापूरवेशीतील हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.
जगभर कोरोनाचे सावट असताना सुद्धा सोलापुरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरा झाली. तरुणाईची उत्साह अगनी शिंगेला पोहचला होता. त्यातच सोलापुरातील तुळजापरवेस येथील तरुणाईने रंग खेळत एका तरुणाची रामनाम सत्य है म्हणत अत्यंयात्रा काढली. याबाबत सोलापुरातील ‘इन सोलापूर न्यूज’ने वृत्त दिले आहे. तरुणांनी बांबूची तिरडी बांधली. त्यावर पांढरे कापड टाकुन त्यावर एका रंगलेल्या तरुणाला झोपवण्यात आले. त्यावर रंग टाकण्यात आला. त्यानंतर चौघांनी या तिरडीला खांद्यावर घेतले. रामनाम सत्य म्हणत वाजवत ही तिरडी नेण्यात आली. यामध्ये तिरडीवर झोपवण्यात आलेल्या तरुणाला हार सुद्धा घालण्यात आला आहे. रंग खेळत असलेल्या या तरुणांनी काढलेल्या अंत्ययात्रेत १५ ते २० तरुण आहेत. रंग खेळेत काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेने सोलापुरातील नागरिकांचे लक्ष वेधले असून चर्चेचा विषय बनला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com