
प्रकाश यलगुलवार, अध्यक्ष.
Theatre Scene in Solapur: माणसाच्या जीवनातील नाट्य हा भाग अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा समजला जातो. नाट्य ही कला जरी असली तरी जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. हे आता आपण जाणून आहोत. कारण आपला एकांत संपला किंवा आपला एकांत भंगला आणि आपल्यासमोर दुसरा कोणी आला की नाट्याला सुरुवात होते, याचा अर्थ आपण दुसऱ्यांसमोर नाटकच करतो असं नव्हे, तर संवाद सुरू झाला की नाट्य हे आपसूक येतच असते.