Massive Infrastructure Push: Gadkari to Launch Projects Worth ₹2784 Crore in Akkalkot
esakal
जेऊर: सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चार महामार्गांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन गुरुवार, १४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता अक्कलकोट नविन बस स्टँडच्या आवारात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.यावेळी सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रियांक खर्गे, बी. आर. पाटील, दिपक वैद्य, राज्यसभा सदस्य डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभा सदस्य धाराशिव ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, आमदार दिलीप सोपल, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार सुभाष देशमुख