Solapur News : गैबीपीर ऊरूसातून शेकडो वर्षाच्या कुस्तीची परंपरेचे जतन

कुस्ती जीवंत ठेवण्यासाठी येथील गैबीपीर उरूसा निमित्त भरवण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला शेकडो वर्षाची परंपरा लाभली.
Gaibipir festival Preserving hundreds of years of wrestling tradition solapur sport
Gaibipir festival Preserving hundreds of years of wrestling tradition solapur sportsakal

मंगळवेढा : तालुक्यात कुस्ती जीवंत ठेवण्यासाठी येथील गैबीपीर उरूसा निमित्त भरवण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला शेकडो वर्षाची परंपरा लाभली. सरपंच प्रशांत गायकवाड यांनी यंदा ही स्पर्धा दोन दिवस आयोजित करून या कुस्ती वीरांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरला.

तालुक्याला कुस्तीची फार मोठी परंपरा नाही मात्र कुस्तीमुळे तरुणांची शारीरिक तंदुरुस्त राहतेन तालुक्यात कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कुस्तीसाठी स्व. भारत भालके, आ. समाधान आवताडे,बबनराव अवताडे, पै. मारुती वाकडे,पै.ज्ञानेश्वर भगरे,पै. राजेंद्र ओमने,पै मुरलीधर सरकळे,पै. दादासाहेब चौगुले,शिवाजी नाईकवाडी यांनी तालुक्यातील कुस्तीवीरांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

शहरांमध्ये गैबीपीर उरूसा शिवाय जय मल्हार क्रीडा युवक सेवा मंडळाच्या वतीने पैलवान मारुती वाकडे हे दरवर्षी 26 जानेवारीला तसेच विजयादशमी निमित्त देखील या स्पर्धा भरवतात, परंतु या स्पर्धेतील तरुणांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन मंगळवेढा महोत्सवात देखील कदम परिवाराने इंग्लिश स्कूलच्या मैदानावर कुस्ती स्पर्धा भरवून या स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय ग्रामीण भागामध्ये शिरसी येथेही या स्पर्धेला प्रोत्साहन दिले जाते अलीकडच्या काळात तरुणाई व्यसनाधीनतेच्या आहारी गेली याशिवाय जे व्यसनाच्या आहारी गेले नाहीत ते मात्र मोबाईलच्या आहारी गेले आहे त्यामुळे त्यांना चांगल्या शरीर संपदेसाठी मोठे कष्ट घ्यावे लागते परंतु हे कष्ट घेण्याची तयारी नसल्यामुळे लवकरच त्यांचे शरीर आजाराला बळी पडत आहे.

मात्र या कुस्तीच्या निमित्ताने सहभाग घेऊन शरीर व्यवस्थित हाताळणाऱ्याचे शरीर मात्र तंदुस्त राहिले. शहरामध्ये खंडोबा गल्लीतील तालमीमध्ये या पैलवानांची वर्षभर तयारी केली जाते. गैबीपीर उरूसानिमित्त यापूर्वी सलग पाच दिवस या कुस्त्या भरवल्या जात असायच्या या कुस्तीसाठी शेकडो वर्षापासून शनिवार पेठ पासून ते शहरात खंडोबा गल्लीपर्यंत रात्रीचा कंदील लावून बक्षीसासाठी वर्गणी गोळा केली.

जायचे हळूहळू पाच दिवस होणारी स्पर्धा एक दिवसावर आली मात्र शहरातील काही नामवंत माजी पैलवानाने यामध्ये पुढाकार घेत ऊरूस कमिटी सरपंच प्रशांत गायकवाड यांना ही स्पर्धा दोन दिवस भरवण्याचा आग्रह केला व त्यांनीही स्पर्धा दोन दिवस भरण्याचा चंग बांधला.

दोन दिवसाच्या स्पर्धेमध्ये जवळपास 350 पेक्षा अधिक जोड्याने सहभाग नोंदवला पन्नास रुपयांपासून ते दहा हजार रुपये पर्यंतचे बक्षीस या कुस्ती वीरांना देण्यात आले या स्पर्धेसाठी मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ या भागातील नामवंत मल्लांचे शिष्य स्पर्धक म्हणून आले होते त्यामुळे उरूसामधील कुस्ती स्पर्धा ही तरुणांमध्ये चांगल्या शरीरासाठी महत्त्वाचे ठरू लागली.

कुस्तीला प्रोत्साहन दिल्यामुळे कमी वयात व्यसनाच्या आहारी जाणारे तरुण या खेळामध्ये गुंतल्याने त्यांचे शरीर चांगले राहू शकते म्हणून सध्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाच्या कुस्ती स्पर्धेत तरुणांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे.

- पै.मारुती वाकडे, मंगळवेढा

शहरातील कुस्तीची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी व तरुण व्यसनमुक्त राहावेत यासाठी यंदापासून ही स्पर्धा दोन दिवस भरण्याचा निर्णय घेतला व या स्पर्धेमध्ये कुस्ती वीरांनी चांगला प्रोत्साहन दिला.

- प्रशांत गायकवाड, सरपंच गैबीपीर उरूस कमिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com