
Solapur: गंगेवाडी येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत स्वीकारून उळे गावाकडे श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. गंगेवाडीच्या पुढे माजी आमदार दिलीप माने यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर उळे ग्रामस्थांनी परंपरेनुसार श्री गजानन राणांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर तलाठी कार्यालया समोर 'आरती ज्ञानराजा पहा कैवल्य तेजा, पंढरीचा वारकरी वारी चुकू नये श्रीहरी' असे साकडे घालत उळे गावात संत श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा विसावला.