
सांगोला : पंढरपूर ग्रामीण पोलिसच्या परिविक्षाधीन अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांनी सांगोल्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांवर कारवाई करत चार लाख ८० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सांगोल्यातील अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.