
प्रमिला चोरगी
सोलापूर: श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेत डौलाने फिरणारे नंदीध्वज हे खेळणी आणि नागफणीमुळे आकर्षित दिसतात. गेल्या ९० वर्षांपासून गणेचारी कुटुंब खेळणी आणि नागफणी बनविण्याची सेवा देत आहे. यंदाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर खेळणी आणि नागफणी बनविण्यात संपूर्ण कुटुंब रमले आहे. वर्षातील १५ दिवस गणेचारी कुटुंब हे सिध्दरामेश्वरांच्या सेवेसाठी एकत्रित येते.