पिलीव घाटात तरुणाची आत्महत्या ! याअगोदरही चौघांनी संपवली होती त्याच परिसरात जीवनयात्रा

Piliv Ghat.j
Piliv Ghat.j

पिलीव (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील पिलीव (सुळेवाडी) घाटाच्या हद्दीत चंडकाची वाडी (उंबरे वेळापूर) येथील अविवाहित तरुण गणेश रमेश गुंड (वय 21) याने अज्ञात कारणाने फॉरेस्टमधील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

मृत गणेश गुंड याला वारंवार घरातून पैसे घेऊन पंधरा- पंधरा दिवस गडप होण्याची सवय होती व परत घरीही यायचा. त्यामुळे गणेशच्या घरच्यांनी कधीही पोलिसात तो हरविल्याची तक्रार दिली नसल्याची माहिती मृताचे वडील रमेश नामदेव गुंड यांनी पिलीव पोलिस स्टेशनला दिली. मृत गणेश गुंड हा मोटारसायकलवरून आला होता. त्या मोटारसायकलवरील नंबरवरून आरटीओशी संपर्क साधला असता पिलीव घाटात आत्महत्या केलेली व्यक्ती गणेश रमेश गुंड असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून पिलीव पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. 

मृतदेह हा गणेशचाच असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन गणेशचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच याविषयी कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल पंडित मिसाळ, सतीश धुमाळ, बापूराव कोकाटे यांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला व मृतदेह माळशिरस येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पंडित मिसाळ हे करीत आहेत. 

दोन वर्षांपूर्वीही चारजणांनी केली होती तेथेच आत्महत्या 
पिलीव (सुळेवाडी) घाटात अंदाजे दोन वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी त्याच ठिकाणी आत्महत्या केली होती. त्यामुळे आत्महत्या करण्यासाठी सुळेवाडी घाट लोकांना सोईस्कर आहे की काय, असा प्रश्न त्या भागातील लोक विचारत असून, मेंढपाळ, जनावरे घेऊन जाणाऱ्या लोकांमध्ये मात्र अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com