Ganesh Visarjan 2023: अकराशे मंडळाची मिरवणूक, सोलापूरात वाहतूक रात्री १२ पर्यंत बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

शहरातील ९७ हजार घरगुती तर ११७७ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
ganesh visarjan 2023 Procession of 11 hundred mandals road closed in Solapur till 12 midnight these are alternative ways
ganesh visarjan 2023 Procession of 11 hundred mandals road closed in Solapur till 12 midnight these are alternative wayssakal

सोलापूर : शहरातील ९७ हजार घरगुती तर ११७७ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. उद्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी या मार्गांवरील वाहतूक रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, घरगुती गणेशमूर्तींसाठी नगरानगरांमध्ये एकूण ८३ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत. दुसरीकडे सार्वजनिक मंडळांसह इतरांना मुर्ती विसर्जन करता करण्यासाठी महापालिकेने १४ ठिकाणी सोय केली आहे.

शुक्रवारी ईद-ए-मिलादच्या तीन मिरवणुका

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विजापूर वेस, नई जिंदगी व शास्त्री नगर येथील तीन ठिकाणाहून ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या मिरवणुका निघणार आहेत. दरम्यान, या मिरवणूक मार्गांवरील गणेश मंडळांनी त्यांचे मंडप व इतर साहित्य तातडीने काढून घ्यावे, जेणेकरून त्या मिरवणुकीला अडथळा होणार नाही, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

आज शहरातील वाहनांसाठी ‘हे’ पर्यायी मार्ग

  • गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने उद्या (गुरुवारी) सकाळी सहा ते रात्री १२पर्यंत मार्गात बदल असणार आहे.

  • त्यानुसार विजापूरहून पुणे किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन विजापूर नाक्यावरून नवीन बायपासमार्गे देगाववरून पुढे जाता येणार आहे.

  • पुण्याकडून विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पूना नाका येथून बायपासमार्गे पुढे जाता येईल.

  • हैदराबादहून पुणे किंवा विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांना नवीन हैदराबाद नाका, जुना हैदराबाद नाका, मार्केट यार्ड, नवीन पूना नाका, नवीन केगाव बायपासमार्गे प्रवास करता येईल.

  • रेल्वे स्टेशन,एसटी स्टॅण्डकडे ये-जा करण्यासाठी विजापूर नाका, आयटीआय पोलिस चौकी, निर्मिती विहार, सलगर वस्ती पोलिस ठाणे, मरिआई चौक, भैय्या चौक, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक ते निराळे वस्तीमार्गे एसटी स्टॅण्ड असे जाता येईल.

  • जुळे सोलापूरहून शहरात येणाऱ्या वाहनांना जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, अशोक चौकमार्गे प्रवास करता येणार आहे.

  • बार्शीकडून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी बार्शी रोड टोल नाका येथून खेडमार्गे केगाव ब्रिजमार्गे सोलापूर आणि शहरात जडवाहनांना मिरवणूक संपेपर्यंत बंदी राहणार आहे. या काळात मार्केट यार्ड चौक- जुना बोरामणी नाका- शांती चौक- अक्कलकोट रोड असा मार्ग सुरु राहणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करून आनंदात व शांततेत मिरवणूक काढावी. सर्व मंडळांना कलम १४९अंतर्गत नोटीस पाठविली असून त्यानुसार सर्वांनी त्याचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये.

- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

सोळाशे पोलिसांचा बंदोबस्त

  • अधिकारी - १३३

  • पोलिस अंमलदार - १४३०

  • नवप्रविष्ठ पोलिस - १५०

  • होमगार्ड - ५००

  • एसआरपीएफ तुकडी - १

हेल्पलाइन

  • पोलिस हेल्पलाइन क्रमांक

  • नियंत्रण कक्ष : ११२

  • ज्येष्ठ नागरिक : १०९०

  • चाइल्डलाइन : १०९८

  • महिला हेल्पलाइन : १०९१

  • वैद्यकीय रुग्णवाहिका : १०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com