
सोलापूर : सर्वांचा लाडका व आराध्यदेवता श्री गणेशाचा एक फेब्रुवारीला सर्वत्र जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्तशहरातील विविध गणेश मंदिरांच्या सजावटीचे व बाप्पांच्या विविध अलंकार आयुधांना सोन्या-चांदीने झळाळी देण्याचे काम होत आहे. विशेष म्हणजे शहरातील मानाच्या आजोबा गणपतीसह कसबा गणपती, सोन्या मारुतीसह मुख्य गणेशमूर्तींच्या सजावटीचे काम जोरात सुरू आहे.