गारमेंट उद्योगाला मिळणार नवी उभारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Dr. Jayasiddheshwar Shivacharya Mahaswami

गारमेंट उद्योगाला मिळणार नवी उभारी

सोलापूर - भारतीय लष्करासाठी गणवेशाची स्वदेशी खरेदी करण्यात येणार आहे. त्याकरिता जीएम पोर्टलवरून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोलापुरातील उद्योजकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे पत्र केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाठविल्याची माहिती खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना दिली.

सोलापूरचे वैभव असलेल्या गारमेंट उद्योगाला एक नवी दिशा मिळावी. यातून शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार डॉ. महास्वामी यांनी लोकसभेच्या अधिवेशनात शून्य तासामध्ये भारतीय लष्करासाठी बनविण्यात येणाऱ्या‍ गणवेशाचे ऑर्डर सोलापूरच्या गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे प्रायोगिक तत्वावर मिळावे, असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

दरम्यान जून महिन्यात लष्करासाठी गणवेश खरेदी नियममावलींच्या तरतूदीनुसार जीएम पोर्टलद्वारे निविदा काढण्याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. या निविदा प्रक्रियेत देशभरातील व्यापारी सहभागी होउ शकतात. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशनला प्रोत्साहित करावे, असे श्री. राजनाथसिंह यांनी खासदार डॉ. महास्वामी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Garment Industry Will Get A New Boost Mp Mahaswami Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurTextile Industry