
अक्कलकोट : घरगुती गॅस सिलिंडचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व छप्पर जळून घरातील दिव्यांग व्यक्तीचा भाजल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जेऊर (ता. अक्कलकोट) शिवारातील वस्तीवर घडली. घटनेची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.