

The three-kilometre stretch remains unpaved even after decades, affecting daily transportation and village connectivity.
Sakal
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगाव ते पानमंगरूळ हा सुमारे ६.५ किलोमीटरचा महत्त्वाचा संपर्क रस्ता असून, घुंगरेगाव ते गुरववस्ती दरम्यानचा सुमारे तीन किलोमीटरचा भाग आजही डांबरीकरणाविना आहे. तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा हा मार्ग पावसाळ्यात चिखलमय होत असल्याने वाहतूक विस्कळीत होत असून विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.ग्रामस्थ संतोष गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पानमंगरूळ ते गुरववस्ती या सुमारे ३.५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र गुरववस्ती ते घुंगरेगाव हा तीन किलोमीटरचा भाग अद्याप कच्चाच असून खडीकरणही झालेले नाही. त्यामुळे अल्प पावसातही रस्ता चिखलमय होऊन वाहतुकीस अडथळे निर्माण होतात.